Supreme Court  Saam tv
Video

MLAs disqualification : ऑपरेशन यशस्वी, पण रुग्णाचा मृत्यू; आमदार अपात्रतेवर आदेश देताना कोर्टाचं विधान

Supreme Court : सुप्रीम कोर्टाने तेलंगणातील आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्षांच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. “ऑपरेशन यशस्वी झालं, पण रुग्णाचा मृत्यू” – आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत.

Namdeo Kumbhar

CJI Bhushan Gavai Latest News : ऑपरेशन यशस्वी झालं, पण रुग्णाचा मृत्यू असं विधान सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेवर आदेश देताना केले आहे. तेलंगणातील दहा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात पार पडली. १० आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या विलंबावरून कोर्टाने नाराजी व्यक्त केली. हा निर्णय पुढील ३ महिन्यांच्या आत घेण्याचे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा स्थगितीचा आदेशही यावेळी रद्द केला.

तेलंगाणामधील हायकोर्टाने विधानसभा अध्यक्षांना चार आठवड्यांत अपात्रतेबाबत सुनावणी घेण्याचे वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात बीआरएसकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तेलंगणाच्या बीआरएसमधील १० आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बीआरएसने त्या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत अपात्र करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्षांनी त्यावर निर्णय घेतला नाही. हायकोर्टातही दाद मिळाली नाही, त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले. गुरूवारी सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश ए. जी मसीह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लव्ह स्टोरीचा भयंकर अंत! तरुणाची निर्घृण हत्या; मुलीचा बाप अन् भाऊ हाती लागला अन् गूढ उकललं

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

SCROLL FOR NEXT