Pawan Kalyan News SaamTv
Video

Super Star Pavan Kalyan News : आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून जोरदार भाषण | VIDEO

Assembly Election 2024 News : भोकर तालुक्यातील पाळज येथे आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांची प्रचार सभा पार पडली. यावेळई त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.

Saam Tv

भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या आणि लोकसभा पोट निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार संतुक हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांची प्रचार सभा भोकर तालुक्यातील पाळज येथे पार पडली. या सभेत पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली, तर भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी तेलगूमधून भाषण करून मतदारांना साद घातली. भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर हा तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. ये तालुक्यातील बहुतांश नागरिक तेलगू भाषा बोलतात. येथील नागरिकांचा तेलंगणा राज्यासोबत रोटी बेटीचा व्यवहार असतो. त्यामुळे भोकर मधील नागरिकांना त्यांच्याच भाषेत प्रचार करण्यासाठी भाजपाने आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री सुपरस्टार पवन कल्याण यांना मैदानात उतरविले. यावेळी पवन कल्याण यांनी मात्र आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. दरम्यान श्रीजया चव्हाण यांना जवळपास पाच ते सहा भाषा येतात. त्यामुळे श्रीजया चव्हाण यांनी तेलगू भाषेमधून भाषण ठोकले आणि तेलगू भाषिक मतदारांना साद घातली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Gondia : राजकारणात खळबळ, महायुतीच्या मंत्र्याने दिला पालकमंत्रीपदाचा राजीनामा, कारण आले समोर | VIDEO

Disha Patani Hot Photos: हॉटनेसचा कहर! अभिनेत्री दिशाला पाहून भल्याभल्याना फुटला घाम

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप

Voter List : अजब कारभार चव्हाट्यावर! नाव, पत्ता नव्हे अनेक गावं मतदार यादीतून गायब, अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT