Deputy Chief Minister Sunetra Pawar  saam tv
Video

Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात! सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा चार्ज; पाहा व्हिडिओ

Deputy CM Sunetra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात पदभार स्वीकारताना त्या भावूक झाल्या असून लवकरच त्या दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Sunetra Pawar becomes Deputy Chief Minister Maharashtra full story : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील ज्या दालनातून अजित पवार कामकाज पाहत होते, त्याच दालनात सुनेत्रा पवार यांनी आज प्रवेश केला. त्यावेळी त्या आणि मुलगा पार्थ भावूक झाला होता.

आपल्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि नतमस्तक झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांचा समावेश होता. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत, जिथे त्या आपल्या खात्याचे पहिले निर्णय घेऊ शकतात. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होणार असून, तिथे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Success Story: जिद्द! IAS होण्यासाठी परदेशातील नोकरी धुडकावली; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? इराणला मिटवण्याचा ट्रम्पचा निर्धार

Milk Benefits For Skin: उन्हाळ्यात काळी त्वचा होईल पांढरीफटक, फक्त या ३ पद्धतीने लावा कच्चे दूध

थलपती विजयच्या विजयाचं रहस्य काय? 2 वर्षांत TVK कशी झाली कॅडरबेस पार्टी?

SCROLL FOR NEXT