Sujay Vikhe Patil SaamTv
Video

Sujay Vikhe Patil : ‘माझ्या नशिबात थोडी गडबड आहे’, भर सभेत विखेंनी दिला नशिबाला दोष; पाहा Video

Pathardi Assembly Constituency News : पाथर्डी तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराच्या उमेदवारच्या प्रचारासाठी गेलेल्या सुजय विखे यांनी भर सभेत आपल्या नशिबाला दोष देत, खासदारकी आणि आमदारकी गेल्याची खंत व्यक्त केली आहे.

Saam Tv

माझं ग्रहमान सध्या खराब आहे. माझ्या नशिबात थोडी गडबड चालू आहे, माझं काही शिजायला लागतं त्याचवेळी कोणीतरी येऊन भांड्याला लाथ मारतं. त्यामुळे सर्व बिघडून जातं म्हणून मला कोणी प्रचाराला बोलवू नका, असं म्हणत भरसभेत सुजय विखेंनीं नशिबाला दोष देत खंत व्यक्त केली.

पाथर्डी तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेला बोलताना सुजय विखे पाटील यांनी नशिबावर खंत व्यक्त केली आहे. ‘‘सध्या माझ्या नशिबात थोडी गडबड चालू आहे. माझं काही शिजायला लागतं त्याचवेळी कोणीतरी येऊन भांड्याला लाथ मारत. लोकसभेला मार्चपर्यत सर्व व्यवस्थित होतं. मात्र एप्रिलला काय गडबड झाली माहीत नाही. खासदारकी गेली आता आमदार होण्याचा विचार केला, त्यावेळी संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या आणि लोक म्हणाले आमदार सुजय विखे होणार तेवढ्यात वसंतरांवांनीं आमच्या शिजलेल्या पातील्याला लाथ मारली. त्यामुळे माझं ग्रहमान ठीक दिसत नाही, मला काही सभेला बोलवू नका.’’ असं विखे यांनी भर सभेत म्हंटल्यावर त्यांच्या या वक्तव्याने आमदार पंकजा मुंडे यांच्यासह उपस्थितांमध्ये मोठा अशा पिकल्याचं बघायला मिळालं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पार्थ राज्यसभेवर? 'वर्षा'वर खलबतं, दीड तासात नेमकं काय ठरलं?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दगडफेक करून तस्कर फरार

बोटं कापली, डोकं ठेचलं, गळा चिरला अन्...; बारावीतील तरुणीसोबत जे घडलं त्यानं गाव हादरलं

सुनेत्रा अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाला होकार? अरोरा निरोप घेऊन मुंबईला रवाना, बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT