Students hold placards and sit with school bags inside Nandura Tehsil Office demanding immediate road construction. saam tv
Video

Maharashtra News: चिखल तुडवत गाठावी लागते शाळा, रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांचा ४ किमी पायी प्रवास| VIDEO

School Children Walk Through Muddy: नांदुरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना दररोज चिखल तुडवत ४ किमी पायी प्रवास करावा लागतो. शाळेची वाट बंद केल्याने त्रस्त विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयातच शाळा भरवत जोरदार आंदोलन केले.

Omkar Sonawane

बुलढाणा जिल्हयातील नांदुरा तालुक्यात असलेले खुमगाव, दहिगाव, केदार, मामुलवाडी, धाडी, भिलवाडी येथून नांदुरा येथे शिक्षण घेण्यासाठी 4 किमी पायी प्रवास करीत शाळेत येतात. मात्र, रस्ता नसल्याने मोठी कसरत विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे. हा त्रास दरवर्षी पावसाळ्यात सहन करावा लागत आहे. तसेच शाळेची वाट ही शेतकऱ्यांच्या शेतातून असते. त्यावेळी शेतकरी पायवाट बंद करीत असतो.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत पायी प्रवास करावा लगत आहे, दरवर्षी जिल्हा प्रशासनाकडे रस्ता तयार करून देण्यासाठी निवेदने दिली जातात. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विद्यार्थ्यांनी नांदुरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसील कार्यालयातच शाळा भरवलीय. आम्हाला रस्ता द्या ही मागणी रेटून धरली. जोपर्यंत् रस्ता तयार करण्याचे निर्देश दिले जात नाही. तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

SCROLL FOR NEXT