unseasonal rain Maharashtra Saam TV News
Video

Amravati : अमरावतीत पावसाचा हाहाकार, पिकं आडवी, घरांचे नुकसान अन् जनावरांचा मृत्यू | VIDEO

unseasonal rain Maharashtra अमरावती जिल्ह्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, अनेक आदिवासी बेघर झालेत.

Namdeo Kumbhar

अमरावती जिल्ह्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले आहे. वरूड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी आणि धारणी तालुक्यांसह मेळघाट परिसरात चक्रीवादळाने हाहाकार माजवला. यामुळे कांदा, केळी, संत्रा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः अंजनगाव सुर्जीतील निमखेड बाजार, चिंचोना, डोंगरावर परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. चिंचोना येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला.

मेळघाटात चक्रीवादळामुळे अनेक आदिवासींच्या घरांची छप्परे उडाली, तर विद्युत खांब आणि झाडे कोसळली. जिल्हा परिषद शाळांचेही छप्पर उडाल्याने शैक्षणिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक आदिवासी बेघर झाले असून, शेती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याने प्रशासनासमोर पुनर्वसनाचा प्रश्न उभा आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Sandip Deshpande : 'मराठी माणसाचा बाप बनायचा प्रयत्न करायचा नाही, अन्यथा...'; संदीप देशपांडेचा मीरारोडमधून थेट इशारा

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, नंतर शारीरिक संबंध; व्हिडिओ काढून धमकी; ३ पानी चिठ्ठी लिहून CAची आत्महत्या

Dombivali : निळजे परिसरात दोन कोटींचे एमडी ड्रग्स जप्त; मानपाडा पोलिसांनी कारवाई, परदेशी ड्रस तस्कराला अटक

Indian Cricketer : भारताचा स्टार क्रिकेटपटू अडचणीत; १० वर्षांचा तुरुंगवास होणार? पीडित तरुणीने भक्कम पुरावा दिला

SCROLL FOR NEXT