Stone Pelting on Vande Bharat Express  saam tv
Video

Vande Bharat Express : हा कसला माज ! मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, VIDEO

Stone Pelting on Vande Bharat Express : मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळ घडलाय.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, मयूर राणे | साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याणनजीक वंदे भारत एक्स्प्रेसवर एका तरुणानं दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून शिर्डीकडे जात होती. आज, शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. रेल्वे पोलिसांनी दगडफेक करून वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान करणाऱ्या हुल्लडबाज तरुणाला अटक केली आहे.

मुंबईहून आज सकाळच्या सुमारास शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर कल्याणच्या पत्री पुलाजवळ एका तरुणाने दगडफेक केली. यात एक्स्प्रेसच्या किमान दोन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेससह इतर एक्स्प्रेस गाड्या आणि एसी लोकलवरही त्याने दगडफेक केल्याची माहिती इतर प्रवाशांनी दिली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सनी कांबळे या तरुणाला अटक केली आहे. हुल्लडबाजी करण्यासाठी आरोपी तरुणाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divyenndu- Mirzapur The Movie : मुन्ना भैया मोठ्या पडद्यावर येणार; 'मिर्झापूर: द मुव्ही' रचणार मोठा इतिहास, 'या' ट्विस्टने खेळ बदलणार

राज्यसभा निवडणुकीसांठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; कोणाला मिळणार उमेदवारी? ही नावे चर्चेत

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी'ची कल्पना सुचली कशी? अभिजीत दीपकेंचा मोठा खुलासा, पाहा Exclusive मुलाखत

Expressways : महाराष्ट्राला मिळाले ४ नवीन द्रुतगती महामार्ग; ५१,९०६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी, २०२८ पर्यंत प्रवास होणार सुस्साट

घरात जिकडे तिकडे झुरळं दिसतायेत? ही सोपी ट्रिक वापरा, झुरळ जातील मरून

SCROLL FOR NEXT