sonia gandhi  saam tv
Video

Sonia Gandhi Hospitalised: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल|VIDEO

Sonia Gandhi hospitalised : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना रविवारी दिल्लीतील सिर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पोटदुखीचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना रविवारी दिल्लीतील सिर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सध्या त्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ही माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे. काही दिवसापूर्वीच सोनिया गांधी यांना शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालया अस्वस्थ वाटल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला होता.

IGMC येथील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले होते की, सोनिया गांधी यांचा रक्तदाब थोडा वाढलेला होता, मात्र त्यांची तब्येत सामान्य असून घाबरण्याचं कारण नाही.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे मीडिया सल्लागार नरेश चौहान यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना काही किरकोळ त्रास जाणवत असल्यामुळेच त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोनिया गांधी यांच्या तब्येतीची माहिती मिळताच मुख्यमंत्री सुक्खूंनी उना दौरा रद्द करून तात्काळ शिमला येथे रवाना झाल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT