Solapur News Today Saam TV News
Video

Solapur: फटाक्याच्या कंपनीत भीषण स्फोट! थरारक Video समोर, पण थोडक्यात अनर्थ टळला, कारण...

Solapur News Today: 15 महिला बालंबाल बचावल्या! वटपौर्णिमेच्या दिवशी फटाक्याचा कारखान्यात थरारक स्फोट, सुदैवानं वटपौर्णिमेच्या सुट्टीमुळे मोठी जीवितहानी थोडक्यात टळली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बार्शी (Barshi) तालुक्यातील घारी गावात फटाका कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर हादरलाय. जवळपास 40 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान या आगीत झालंय. दरम्यान, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. युन्नूस मुलाणी यांच्या मालकीच्या असलेल्या फटाका कारखान्यात ही आग लागली. नेमकी ही आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर काम करतात. मात्र सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला कारखान्यात नव्हती. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT