Solapur Saam Tv
Video

Solapur : सोलापुरमध्ये तुफान पाऊस! पूराचं पाणी घरात शिरलं, संसार उपयोगी साहित्याचे नुकसान; महिलांच्या डोळ्यात अश्रू | VIDEO

Heavy Overnight Rainfall in Solapur : सोलापूरमध्ये रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मित्रनगर, जुना विडी घरकुल, पंजावणी मार्केट व होटगी रोड परिसर पाण्याखाली गेला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर शहरात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मित्रनगर परिसरासह सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. अनेक कुटुंबांना रात्रभर उघड्यावर काढावी लागली. महिलांना व मुलांना विशेषतः मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जुना विडी घरकुल परिसर, अक्कलकोट रोड परिसरातील पंजावणी मार्केट तसेच होटगी रोड तलावाजवळील घरे पाण्याखाली गेली आहेत. अचानक आलेल्या पुरसदृश परिस्थितीमुळे रस्ते व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. हवामान खात्याने यापूर्वीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

Yoga For Thyroid: थायरॉईडचं नियंत्रण आता तुमच्या हातात, करा 'ही' सोपी योगासनं

MHADA Housing Lottery:पुण्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगलीतही म्हाडाच्या घरांची लॉटरी; लाभ घेण्यासाठी 'या' ८ गोष्टी अत्यंत महत्वाच्या

माझ्या दाजींना टॉर्चर...;मेहुण्याचा खळबळजनक खुलासा, बीडच्या माजी उपसरपंच मृत्यूप्रकरणात ट्विस्ट

SCROLL FOR NEXT