ICC Women Cricket Saam TV
Video

Smriti Mandhana News : आयसीसी महिला क्रमवारीत स्मृती मानधना अव्वल|VIDEO

Womens Cricket : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मनधना आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचली आहे.तिच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी फलंदाजीमुळे हे यश मिळालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मनधना हिने आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन महिला एकदिवसीय क्रमवारीत स्मृती मनधना अव्वल स्थानी पोहोचली आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच एखादी भारतीय फलंदाज या क्रमवारीत टॉपवर आली आहे. अलीकडेच झालेल्या मालिकांमध्ये स्मृतीने सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळी करत उत्तम योगदान दिलं आहे, ज्यामुळे तिला हे स्थान मिळालं आहे.

याशिवाय, भारतीय संघातील आणखी दोन खेळाडूंनीही या क्रमवारीत स्थान मिळवलं आहे. जेमिमा रॉड्रीग्स आणि हरमनप्रीत कौर यांचाही रँकिंग यादीत समावेश झाला आहे, ज्यामुळे भारतीय संघाचं बळ आणखी वाढलेलं दिसत आहे. या तीन खेळाडूंच्या यशामुळे भारताच्या महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावला असून, आगामी स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर संपूर्ण संघासाठी अभिमानास्पद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Shastra: जेवताना तुम्हीही टीव्ही-मोबाईल पाहता का? वास्तु शास्त्र सांगतं थांबा...! नकळत तुम्ही करताय 'या' चुका

Washim Heavy Rain : मुसळधार पावसाने नदीला पूर; पाण्याच्या अंदाज न आल्याने ट्रक पलटी, कॅबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू

Mumbai Shocking : मुंबई हादरली! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या रिक्षात अत्याचार

Pune : पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला बेड्या घातल्या, थरार CCTV मध्ये कैद | पाहा VIDEO

Home Remedies: झोपेच्या अभावामुळे अपचनाचा त्रास होतोय?'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

SCROLL FOR NEXT