Sindhudurg Guardian Minister Nitesh Rane during the surprise raid on a matka den in Kankavli market. Saam Tv
Video

सिंधुदुर्ग कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणे यांची धाड|VIDEO

Kankavli Market Gambling Den: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या धाडीत अनेकांना अटक करण्यात आली असून पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Omkar Sonawane

नितेश राणे यांनी पालकमंत्री झाल्यानंतरची पहिली कारवाई

कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर अचानक धाड

मुख्य आरोपी घेवारीसह नऊ-दहा जण ताब्यात

पोलिसांना पूर्वकल्पना नसताना मंत्री स्वतः कारवाईस उपस्थित

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली शहरातील बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. घेवारी नावाच्या व्यक्तीच्या अड्ड्यावर सुरू असलेल्या मटक्याच्या धंद्यावर त्यांनी अचानक पोहोचत सगळ्यांना धक्का दिला. या धाडीत नऊ ते दहा जण मटका खेळताना आढळले असून त्यांच्यासह मुख्य आरोपी घेवारीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कारवाईबाबत पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. नितेश राणेंच्या धाडीनंतर मात्र कणकवली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई सुरू केली. पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी केलेली ही पहिलीच धडक कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT