Mumbai Local Video Saam Tv
Video

Shocking: तिकीट विचारल्याने राग अनावर, प्रवाशाकडून टीसीला मारहाण; सरकारी मालमत्तेची तोडफोड, पाहा VIDEO

Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना घडली. तिकीट विचारल्याचा राग आल्याने प्रवासी आणि टीसीमध्ये वाद झाला. त्यानंतर या प्रवाशाने टीसीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

विरार लोकलमध्ये तिकीट तपासणीवरून प्रवासी आणि टीसीमध्ये वाद झाला. तिकीट विचारल्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने टीसाला मारहाण केली. त्यानंतर या प्रवाशाला टीसी ऑफिसमध्ये आणण्यात आले. याठिकाणी देखील प्रवाशाने तुफान राडा केला. त्याने टीसी ऑफिसमधील साहित्याची तोडफोड केली. टीसी ऑफिसमधील कम्प्युटर, तसंच इतर महत्वाच्या वस्तूंची त्याने तोडफोड केली.

दादर ते बोरीवली लोकलमध्ये फस्ट क्लासच्या डब्यात हा प्रवासी बसला होता. मात्र त्याच्याकडे सेकंड क्लासचे तिकीट होते. त्यामुळे टीसीने त्याच्याकडे विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला. यानंतर झालेल्या हाणामारीत दोघेही जखमी झाले आहेत. या प्रवाशाचा टीसी ऑफिसमध्ये तोफडोड करतानाचा व्हिडीओ समोर आला असून तो तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी देखील मुंबई लोकलमध्ये टीसीला प्रवाशांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp चा पर्याय बनवणाऱ्या Zoho Mail चे संस्थापक आहेत 'भारतीय', संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, अचानक आलेल्या पावसाने उडाली पुणेकरांची दाणादाण; पाहा VIDEO

Varicose Veins: ९ ते ५ ऑफिसमध्ये बसून काम करणं धोक्याचं, वेळीच जाणून घ्या नुकसान आणि शरीरावर होणारे गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

SCROLL FOR NEXT