MVA seat Sharing : महाविकास आघाडीमध्ये कोल्हापुरातील सहा जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.  saam tv
Video

Maharashtra Elections : महाविकास आघाडीत बिघाडी? ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा

MVA seat Sharing News : महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच, ठाकरे गटाने कोल्हापुरातील विधानसभेच्या सहा जागांवर दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

Saam Tv

विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे. दिवाळीपूर्वीच जागावाटपांवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आपांपसात फटाके फुटण्यास सुरुवात झाल्याची चिन्हे दिसताहेत. महाविकास आघाडीत काही जागांवरून तिढा असल्याचे सांगितले जात असून, त्याला आता दुजोरा मिळाला आहे. कोल्हापुरातील सहा जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सहा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. राधानगरी, शिरोळ, शाहुवाडी, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, चंदगड हे सहा मतदारसंघ ठाकरे गटाला हवे आहेत. या मतदारसंघांवर आमच्या पक्षाचा हक्क आहे. तो हक्क मिळावा, अशी मागणी आमचे नेते करत आहेत, असं ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी केली आहे. कोल्हापूर ही शिवसेनेची जागा होती. अमरावती, रामटेक मतदारसंघही शिवसेनेचा होता. तो मागच्या निवडणुकीत काँग्रेसला दिला. विधानसभा निवडणुकीतही तशा प्रकारचे अपवादा‍त्मक बदल करण्यास काही हरकत नाही, असेही मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नस कापल्या अन्...; कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा

Cultural Department Bonus: 'चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सरकारकडून इतका बोनस जाहीर

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी मानली जाते शुभ

Nushrratt Bharuccha Photos: हॉट अभिनेत्री नुसरत भरूचा, फोटो पाहून तुमचीही उडेल झोप

SCROLL FOR NEXT