Sanjay Raut SaamTv
Video

Sanjay Raut : मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला; राऊत यांचा टोला

Hariyana - Jammu Kashmir Results : हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

उत्तर प्रदेश, गुजरातसह कोणत्याही राज्यात निवडणूक घेतली तरी भाजपचा पराभव निश्चित आहे. मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकतील आणि भाजपचा पराभव होईल, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातील काँग्रेस आघाडीवर होती. मात्र काही वेळाने भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हरियाणात भाजप विरोधी लाट आहे. अंतिम निकालावेळी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. सध्या हरियाणामध्ये भाजप, मोदा आणि अमित शाह विरोधात लाट आहे आणि तेथील जनता यावेळी कोणत्याही परिस्थिती भाजपला निवडून देणार नाही. निवडणुकीचे कल सध्या येणे सुरू आहे. हरियाणात काँग्रेस आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरेन्स आघाडीची सरकार येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमध्ये 370 सह इतर मोठमोठ्या गोष्टी करत होते, अखेर काश्मीरच्या जनतेने मोदी, अमित शहा आणि भाजपला राज्यातून हद्दपार केले, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khadakwasla Exit Poll : तिरंगी लढतीत कोण जिंकणार? खडकवासल्याचा एक्झिट पोल काय सांगतो?

Chembur Exit Poll: चेंबूर मतदारसंघातून कोण मारणार बाजी? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT