Gunaratna Sadavarte  saam tv
Video

गुणरत्न सदावर्तेंच्या कानशिलात मारा, 1 लाख घ्या, ठाकरे गटाच्या नेत्याची ऑफर | VIDEO

Gunaratna Sadavarte on Uddhav Thackeray : हिंदी भाषेसंदर्भातील दोन शासन निर्णय सरकारनं रद्द केल्यानंतर राज ठाकरेंसह मनसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक विजयी मेळावा काढणार आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल, अशी ऑफर ठाकरे गटाच्या नेत्यानं दिली आहे.

Nandkumar Joshi

Rs 1 lakh bounty to Who slapped Gunaratna sadavarte : महाराष्ट्रातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा शासन निर्णय सरकारनं काढला होता. त्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता. या विरोधामुळं सरकारनं माघार घेत त्रिभाषा सूत्रासंदर्भात काढलेले दोन्ही जीआर रद्द केले होते. हा मराठी माणसाचा विजय आहे, असं राज आणि उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. तसंच मनसे आणि शिवसेनेकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती.

राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे असो, कुणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही. स्वतःची लेकरं किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावे. दुसऱ्यांच्या लेकरांच्या शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन निघालात. कोणताही महाराष्ट्रातील सामान्य माणूस सहन करणार नाही, अशी टीका सदावर्तेंनी केली होती. त्यावर ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कानाखाली मारणाऱ्याला शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हिंदी सक्तीविरोधात मराठी माणसाचा विजय झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठी माणसाच्या विरोधात बोलत आहेत. या माणसाला जो कानाखाली वाजवेल त्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल, असं सायन-कोळीवाडामधील शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक प्रशांत भिसे यांनी जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

SCROLL FOR NEXT