Police intervening in Jogeshwari after Thackeray and Shinde Sena workers clash over umbrella distribution event. saam tv
Video

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे - शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी; छत्री वाटपाच्या कार्यक्रमावरून वाद | VIDEO

Jogeshwari Shiv Sena Brawl During Free Umbrella Even: जोगेश्वरीत मोफत छत्री वाटपाच्या कार्यक्रमावरून ठाकरेसेना आणि शिंदेसेनेमध्ये जोरदार हाणामारी झाली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वाद चिघळला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

Omkar Sonawane

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात रविवारी ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. छत्री वाटपाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद बाचाबाचीतून थेट हाणामारीपर्यंत गेला. या प्रकारामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाकरेसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत छत्री वाटपाच्या कार्यक्रमावर शिंदेसेनेच्या शाखाप्रमुखांनी टीका केली होती. या टीकेनंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. वाद इतका वाढला की कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

जोगेश्वरीतील या घटनेमुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा पेटले असून, ठाकरेसेना आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT