Eknath Shinde Saam Tv
Video

एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसर्‍याचा AB फॉर्म गिळला अन् विषयच संपवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Latest Marathi news : पुणे महापालिका निवडणुकीच्या छाननीदरम्यान शिवसेनेने एकाच प्रभागात दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ झाला, यावेळी एका उमेदवाराने प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

Namdeo Kumbhar

Shiv Sena gives same AB form to two candidates : शिवसेनेकडून पुण्यात दोन उमेदवारांना एकच एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या एका उमेदवाराने थेट प्रतिस्पर्धी असलेल्या दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म गिळून टाकला. शिवसेनेकडून उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे या दोन उमेदवारांना प्रभाग क्रमांक 34 मधून एकच ए.बी. फॉर्म देण्यात आला. ही बाब काल छाननी प्रक्रियेच्या वेळेस उघडकीस आली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला क्षेत्रीय कार्यालयात चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं. इथे आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की माझा प्रतिस्पर्धी कांबळे यांनी माझा AB फॉर्म फाडला आहे. त्यांनी तो फॉर्म पाडला आणि खाऊन टाकला. मी अधिकृत उमेदवार आहे पक्षाचा कारण मी आधी फॉर्म भरला होता अशी प्रतिक्रिया मच्छिंद्र ढवळे यांनी दिली आहे. आता निवडणूक आयोग मला पत्र पाठवणार आहे. यावर आता पक्ष निर्णय घेईल कारण पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली होती. ते देखील आमच्या पक्षातले आमचे मित्र आमचे वैर नाही असं ही ढवळे म्हणाले. दरम्यान, या सगळ्या घटने प्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात उद्धव कांबळे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजपचे नाराज उमेदवार बच्चू कडू यांच्या भेटीला...

भाजप पाठोपाठ आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनं उघडलं खातं, मतदानाआधीच उधळला विजयाचा गुलाल|VIDEO

Marathi Serial Off Air : नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत ठाकरे गटाच्या उपनेत्याचा राजीनामा, पक्षात खळबळ|VIDEO

Beed Crime: २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, ऊस तोडणी करताना भयंकर घडलं; बीड हादरले

SCROLL FOR NEXT