Saibaba Temple Shirdi Saam TV
Video

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sai Baba Mandir Trust Shirdi: साई संस्थानने हज यात्रेसाठी निधी दिल्याची अफवा व्हायरल झाली होती. अश्या खोट्या अफवा पसरवल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साईबाबा व साईसंस्थानविरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्यांना आता कारवाई होणार आहे. अशा प्रकारांची गांभीर्याने दखल घेत साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की, संस्थानविषयी बदनामीकारक पोस्ट किंवा खोट्या अफवा पसरवल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर “साई संस्थानने हज यात्रेसाठी ३५ कोटींची देणगी दिली” अशी खोटी आणि भ्रामक माहिती व्हायरल झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना गाडीलकर यांनी स्पष्ट केलं की, संस्थानने अशा कोणत्याही प्रकारचा निधी दिलेला नाही.

साईसंस्थानच्या नावाने अफवा पसरवणं, धार्मिक भावना दुखावणं आणि समाजात गैरसमज निर्माण करणं हे गुन्ह्याचं कारण ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री करावी, असं आवाहनही गाडीलकर यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुट्टीच्या दिवशी मंत्रालयाचा कारभार वेगात; रविवारी सरकारने काढले तब्बल 207 जीआर|VIDEO

Maharashtra Live News Update: बैलगाडा शर्यतीत थरार! बैलाची घोडीवरून उडी; मोठा अपघात टळला

New Labour Code: वर्षभरात ग्रॅच्युटी, बेसिक सॅलरी वाढणार; बुधवारपासून नवा कामगार कायदा,वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT