sharad pawar saam tv
Video

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शरद पवारांचे मोठं विधान, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar on NCP: शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे. संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधलाय.

Omkar Sonawane

गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. अमोल मिटकरींनी देखील याचे संकेत दिले होते. तर सुप्रिया सुळे यांनी याला दुजोरा दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. मात्र, आता यावरच शरद पवार यांनी यावर मोठं विधानं केलं आहे. ते म्हणाले, आताच कुणीतरी भाषण करताना म्हटलं की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. पण सगळे म्हणजे कोण? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. हे सगळे म्हणजे गांधी-नेहरू चव्हाण यांचा विचार फुले, शाहू-आंबेडकर यांचा विचार माननारे असतील तर मला मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपाबरोबर जाऊन बसणारे लोक असतील तर ते कॉँग्रेसचा विचार माननारे नाहीत. कुणाशीही संबध ठेवू पण भाजपाशी संबंधित लोक कॉँग्रेसच्या विचाराचे असू शकत नाही. त्यामुळे अशा संधीसधुपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचे नाही अशी भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT