NCP Sharad Pawar Group News SaamTv
Video

Assembly Election : शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणाऱ्यांची भाऊगर्दी !

Sharad Pawar Group : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील नेत्यांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार यांच्या गटात इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली बघायला मिळत आहे.

Saam Tv

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या गटातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याने या उमेदवारांच्या अर्जाची भाऊगर्दी झालेली दिसत आहे. अमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे 29 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात 13 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. उदगीरमध्ये संजय बनसोडेंच्या विरोधात 12 अर्ज आले आहेत. तर येवल्यातून छगन भुजबळ यांच्या विरोधात 11 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध लढण्यासाठी 8 इच्छुक आहेत. आहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात 7 इच्छुकांचे अर्ज आहेत. त्याचबरोबर आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात 3 अर्ज आले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडून विधानसभा लढवणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. आगामी विधानसभेत यामुळे अजित पवार यांच्या गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT