Sharad Pawar engages in a friendly chess match with students during his visit to Vidya Pratishthan School in Baramati. saam tv
Video

Maharashtra Politics: शरद पवारांची पुढची चाल काय? VIDEO

Sharad Pawar Playing Chess With Students In Baramati: बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शाळेत शरद पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत खेळलेला बुद्धिबळाचा सामना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पवारांच्या साधेपणाचा आणि विद्यार्थ्यांशी संवादाचा खास व्हिडिओ पाहा.

Omkar Sonawane

बारामती: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या सुपा येथील विद्या प्रतिष्ठान शाळेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळाचा रंगलेला सामना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले बुद्धिबळ पवारांना दाखवले असता त्यांनी ते आवर्जून पाहिले आणि खेळण्याचा मोह आवरला नाही.

यावेळी पवार यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून काही वेळ बुद्धिबळ खेळला. या अनपेक्षित क्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पवार यांच्या साधेपणाचा आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या संवादाचा अनुभव उपस्थितांना खास वाटला.

या भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्या प्रतिष्ठानमधील हा खास क्षण सोशल मीडियावरही चर्चेत आला असून, विद्यार्थ्यांसोबतचा पवारांचा हा मैत्रीपूर्ण अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच बुद्धिबळ खेळत असताना शरद पवारांची पुढची चाल काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्गावरील लोणेरे येथील पुलाच्या पहाणीनंतर भरत गोगावले संतापले

विधानसभेत भाजप अन् विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावले; 5 आमदारांना सभागृहातून बाहेर काढलं

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय! रोज एक ग्लास कारल्याचा रस प्या

Kidney Stone Diet: किडनी स्टोनचा त्रास आहे? आहारात 'हे' ७ पदार्थ घ्या; मिळेल 2 आठवड्यात आराम

रडल्याने शरीरावर काय परिणाम होतो? आश्चर्यकारक 5 फायदे तुम्हाला माहित आहे का?

SCROLL FOR NEXT