Former Pune Mayor Prashant Jagtap after joining the Congress party ahead of municipal elections. Saam Tv
Video

शरद पवारांना मोठा धक्का! निष्ठावंत नेत्याने २६ वर्षांची साथ सोडली, काँग्रेस पक्षाकडून मैदानात उतरणार|VIDEO

Prashant Jagtap Joins Congress After Leaving NCP: शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी २६ वर्षांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Omkar Sonawane

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. वानवडी प्रभागातून त्यांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मी साडे सव्वीस वर्षे पक्षाला दिलेत, माझ्या आयुष्यातला खूप मोठा वेळ दिला आहे. पण बाहेर पडत असताना आपण कुठेही भाजपमध्ये किंवा जातिवादी पक्षात जायचं नाही, हा माइंडसेट क्लियर होता. शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला असून, जुन्या पक्षातील नेत्यांबद्दल कोणताही आकस नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या विचारधारेवर विजय मिळवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Case No. 73: मुखवट्यामागचं गूढ उलगडणार! थरारक रहस्यकथेने सज्ज 'केस नं. ७३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Tuesday Horoscope: तब्येतीकडे लक्ष द्या, 5 राशींचं भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर; पहिल्या यादीत फक्त ७ नावे

Carrot Barfi Recipe : एकदा 'गाजर बर्फी' खाल्लात तर बाकी मिठाई विसराल, 'ही 'घ्या सिंपल रेसिपी

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नववर्ष सेलिब्रेशनसाठी मेट्रो रात्रभर धावणार; कसं असेल वेळापत्रक

SCROLL FOR NEXT