Sharad Pawar and Ajit Pawar  Saam Tv
Video

Maharashtra politics : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार! अजित पवारांनी दिले राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत, दादा नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar hints at NCP merger : अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पुणे-पिंपरी महापालिका निवडणुकीतील युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar and Ajit Pawar reunification news : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. त्यानंतर विलीकरणाच्या चर्चेने जोर धरला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? यावर बोलताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले झालं गेलं गंगेला मिळाले, आता ऐकोप्याने काम करायचं. अजित पवार यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. यावर अद्याप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. त्यामुळं पुढच्या काळात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का? असा प्रश्न पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

Maharashtra Live News Update: घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ वाहने धडकली

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT