शरद पवार आणि अजित पवार यांच्यात तासभर चर्चा, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व saam tv
Video

Maharashtra Politics : शरद पवार - अजित पवार यांची भेट, तासभर चर्चेत नेमकं काय झालं? | VIDEO

Sharad Pawar-Ajit Pawar Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली असून, त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळं राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

Nandkumar Joshi

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला. या भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट दोन निवडणुकांमध्ये आमनेसामने आले. मागील काही दिवसांत विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या. आता पुन्हा राजकीय नेत्यांच्या आणि विश्लेषकांच्या भुवया उंचावणारी राजकीय घटना घडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांची भेट झाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वायबी सेंटरमध्ये हे दोन्ही नेते भेटले. त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. प्राथमिक वृत्तानुसार, माळेगाव साखर कारखान्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ही भेट झाल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Accident : अस्थी विसर्जन करून परतताना भरधाव कारची ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Pillow Talk: पिलो टॉक म्हणजे काय? नवरा- बायकोसाठी का महत्त्वाचे आहे?

Maharashtra Live News Update: मालाडमध्ये १४ वर्षीय मुलाने घेतले जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल

डर्टी बाबाचा डर्टी पिक्चर! चैतन्यानंद सरस्वतीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सापडलं सेक्स टॉय अन् पॉर्न व्हिडिओच्या पाच सीडी

SCROLL FOR NEXT