Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Sakshi Sunil Jadhav

यशासाठी मेहनत

आचार्य चाणक्यांच्या मते फक्त मेहनत पुरेशी नसून योग्य वेळी योग्य रणनीती आणि संयम आवश्यक आहे.

Chanakya Niti | pinterest

मनातील योजना लगेच सांगू नका

आपल्या महत्त्वाच्या योजना पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीसमोर त्यांची माहिती उघड करू नये, असा चाणक्यांचा सल्ला आहे.

Chanakya Niti | pinterest

चाणक्यांचा खास श्लोक

“मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत्” या श्लोकातून मनात ठरवलेले काम पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवण्याचा संदेश दिला आहे.

Chanakya Niti | yandex

अनावश्यक सल्ल्यापासून दूर राहा

योजना आधीच सर्वांना सांगितल्यास नको असलेला सल्ला आणि टीका मिळून आपल्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.

Chanakya Niti | Social media

स्पर्धकांना संधी देऊ नका

व्यवसाय किंवा महत्त्वाची योजना वेळेआधी उघड केल्यास स्पर्धकांना त्याचा फायदा घेण्याची शक्यता असते.

Chanakya Niti | Social media

बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या

आपल्या ध्येयाबद्दल सतत बोलण्याऐवजी त्यासाठी शांतपणे काम करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Chanakya Niti

सोशल मीडिया

आजच्या सोशल मीडिया युगात प्रत्येक छोटा-मोठा निर्णय सार्वजनिक करण्याऐवजी काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवणे योग्य ठरू शकते.

Chanakya Niti

तुमचं काम

चाणक्यांच्या या नीतीचा सार असा की, कमी बोला, योजनांवर शांतपणे काम करा आणि यश मिळाल्यानंतर तुमचे कामच बोलू द्या.

Chanakya Niti in Marathi | pintrest

NEXT : LPG ग्राहकांसाठी शेवटची संधी! ३० सप्टेंबरनंतर बंद होणार हा मोठा फायदा, लगेच करा हे काम

LPG subsidy 2026
येथे क्लिक करा