Shambhuraj Desai Saam Tv
Video

महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही स्पर्धा नाही, शंभुराज देसाई यांनी दिली प्रतिक्रिया

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा पहिला टप्प्यात महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे.

Manasvi Choudhary

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा पहिला टप्प्यात महायुतीला मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र दिसत आहे. सुरूवातीच्या कलानुसार, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीने २२३ चा टप्पा पार केला आहे. यासंदर्भात नुकतीच शिवसेना शिंदे गट नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"मी गावागावात फिरलो आहे. लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या निवडणुकीत मला मिळाला आहे आणि यामुळेच मताधिक्यात हळूहळू वाढ होताना आहे. यामुळेच आज सर्वानुमते माझ्या मतदारसंघात महायुतीचा विजय होईल असं त्यांनी म्हटलं आहे. आमच्यात मुख्यमंत्री पदाची कोणतीही स्पर्धा नाही. अचूक निकाल पूर्ण लागल्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख मंडळी एकत्र बसून मुख्यमंत्री पदावर योग्य तो निर्णय घेतील.

लोकशाहीमध्ये जनतेला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. महायुतीत आमच्या तिन्ही नेत्यामध्ये चांगला एकोपा आहे यामुळेच आता कोण मुख्यमंत्री होणार यावर आमचे तिन्ही नेते एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही. आमच्यात कोणतेही हेवेदावे नाही. आमचं उद्दिष्ट एकच होतं जे आम्ही सत्यात उतरवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suna Yeti Ghara: घर, माणसं आणि नात्याचा खेळ पुन्हा रंगणार; 'सुना येती घरा' छोट्या पडद्यावर लवकरच सुरु होणार नवी मालिका

Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? आत्ताच करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दंड; वाचा काय आहे नियम?

Jalgaon Crime: जळगाव हादरले! २८ महिन्यांत ५० चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, आरोपी नातेवाईकच असल्याचे उघड

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

PM kisan Yojana : शेतकऱ्यांनो या २ चुका टाळाच, अन्यथा ₹२००० होतील बंद; पीएम किसान योजनेवर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT