8.5 Kg Ganja Seized from Shalimar Express at Kalyan Station, One Arrested by RPF-GRP Team Saam Tv
Video

Kalyan News: शालिमार एक्स्प्रेसमधून ८.५ किलो गांजा जप्त; कल्याणमध्ये GRPF पोलिसांची मोठी कारवाई|VIDEO

Shalimar Express Drug Trafficking Incident: शालिमार एक्स्प्रेसमधून कल्याण स्थानकावर उतरलेल्या एका तरुणाकडून ८.५ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरपीएफ व जीआरपीने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली असून, गांजाची किंमत अंदाजे ६९ हजार रुपये आहे.

Omkar Sonawane

कल्याण: शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. शिराज खलील खान (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे आणि सध्या वेल्डिंगच्या कामासाठी ओडिशामध्ये राहत होता.

आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला. त्यावेळी स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ८.५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे.प्राथमिक चौकशीत शिराज खानने हा ओडिसा येथून आणला असून ती भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपी विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंनी पक्ष घेऊन जायला नको होतं- बच्चू कडू

Pune Crime: देवाच्या आळंदीत लाजिरवाणं कृत्य, तरूणीचे अपहरण करून अब्रुचे लचके तोडले, किर्तनकार महिलेनं रचला कट

Accident News : स्टिअरिंग लॉक झाले अन् चहाच्या टपरीत शिरला ट्रॅक्टर; दोन जण गंभीर जखमी

Pimples And Digestion: चेहरा पिम्पल्सने भरलाय? हे असू शकतं कारण, वाचा एक्सपर्ट्स काय सांगतात

SCROLL FOR NEXT