प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यांगप्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. त्याप्रकरणी त्यांची चौकशी देखील सुरु आहे. त्याच अनुशंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा-२०२२च्यास निवड प्रक्रियेत २२ उमेदवार उत्तीर्म झाले आहेत. त्यातील ८ उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी आल्या असून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी प्राधिकरणासमोर उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पडताळणीचे निर्णय ५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत MPSC ला कळवायचे आहेत. प्राधिकरणासमोर गैरहजर रहाणाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद मानले जाउन निवड प्रक्रियेतून वगळले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.