बीडमध्ये दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. सहाव्या दिवशी त्याला अटक करण्यात आली. हा खोक्या महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशपर्यंत कसा पोहचला याचा संपूर्ण घटनाक्रम पोलिस तपासातून समोर आला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा पोलिसांनी मोठ्या शिताफिने प्रयागराज येथून अटक केली. यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात आली. प्रयागराज पोलिस आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज एअरपोर्टवरून त्याला अटक केली. खोक्या भोसलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने सर्वात आधी पुणे गाठले. त्यानंतर तो अहिल्यानगरमध्ये गेला. अहिल्यानगरमध्ये थांबल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला.
त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता खोक्याने संभाजीनगर येथून प्रयागराजला जाण्यासाठी ट्रॅव्हलने प्रवास केला. जबलपूर आणि प्रयागराजमध्ये तो थांबला होता. प्रयागराज येथे लोकेशन बदल असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आज खोक्याला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर ट्रांजेक्ट रिमांड घेऊन त्याला बीडमध्ये आणून कोर्टात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे. खोक्याविरोधात बीडमध्ये आतापर्यंत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.