Ahmadnagar VIDEO: साडी बनली जीवनाची दोरी! ताराबाईंच्या साडीने वाचवले दोन तरुणांचे जीव  Saam TV
Video

Ahmadnagar VIDEO: साडी बनली जीवनाची दोरी! ताराबाईंच्या साडीने वाचवले दोन तरुणांचे जीव

Ahmadnagar Godavari River News: गोदावरी नदी पात्रात तीन तरुण जात होते वाहून, ताराबाई नामक महिलेने वाचवले जीव.

Uday Satam

अहमदनगरमधील दारणा धरण क्षेत्रात संततधार सुरु असल्यामुळे हे धरण 80 टक्क्याहून अधिक भरले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली. कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हे तिघे तरुण भावंडं नदीतील मोटारी काढण्यासाठी गोदावरी पात्रात उतरले. नदी पात्रातील पाणी वाढल्याने तिन्ही तरुण वाहत गेले.तरुण गोदावरी नदी पात्रात बुडत असताना परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाई नामक महिलेने प्रसंगावधान दाखवत अंगावरील साडी काढून नदी पात्रात फेकली आणि दोघांचे प्राण वाचवले आहेत. ताराबाईने दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र या घटनेत दुर्दैवाने एका तरुणाला वाचवण्यात अपयश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT