Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam Appointed As Lawyer saam tv
Video

Santosh Deshmukh Case: देशमुख कुटुंबीयांची एक मागणी मान्य; उज्ज्वल निकम लढवणार संतोष देशमुख हत्येचा खटला

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam Appointed As Lawyer: संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मंजूर केलीय.

Bharat Jadhav

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडलीय. देशमुख कुटुंबीयांची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकार वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी अखेर मान्य झालीय. राज्य सरकारने २५ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केलाय. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आठ मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या मागणीत उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या मागणीचाही समावेश होता. राज्य सरकारने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आदेश काढलेत.

या आदेशानुसार, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकिलांचे सहाय्यक म्हणून नियुक्ती केलीय. संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने लोटले असून, तपासात कोणतीही प्रगती नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. आता देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT