Top 10 @ 6 PM SaamTv
Video

Top Headlines @ 6 PM : कोलकत्ता प्रकरणात संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा, पंकजा मुंडे यांच्या विधानाने चर्चाना उधाण... वाचा ६ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर, जळगावमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- कोलकत्ता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा. सियालदह कोर्टाचा मोठा निर्णय.

- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी लांबणीवर. २२ एवजी २८ जानेवारीला होणार सुनावणी.

- बीडचं पालकमंत्रिपद मिळालं असतं, तर अधिक आनंद झाला असता. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विधानाने चर्चाना उधाण.

- जळगावमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना. प्रेम विवाह केल्याच्या रागातून जावयाची सैराट स्टाईल हत्या. संतप्त नातेवाईकांकडून आरोपींचं घर जाळण्याचा प्रयत्न.

- पुण्यात चाकण औद्योगिक वसाहतीत स्टील कंपनीच्या मालकवर दिवसाढवळ्या गोळीबार. दुचाकीवरून आलेले हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद.

- नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक: रिक्षाने धडक दिल्यामुळे झाला राडा, पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या; शहरात तणावपूर्ण शांतता.

- संभाजीनगरमध्ये टोरेससारखाच कोट्यवधींचा घोटाळा. ३५ कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार.

- राज्यात १७७९ सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्रं बोगस. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना.

- राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. दोन दिवसांत तापपमान १ ते २ अंश सेल्सिअसनं घटण्याचा अंदाज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT