ED Dada Bhuse Saam TV
Video

Sanjay Raut : 'ED धाडीचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाऊ शकतात' संजय राऊत यांचा भुसेंवर हल्लाबोल | VIDEO

Vasai-Virar : वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभर ईडी कारवाई सुरू असून, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. ईडीच्या धाडीचे धागेदोरे थेट दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात, असा गौप्यस्फोट करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.याचसोबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हटलं, समज द्या अन् सोडून द्या हा नवा ‘फडणवीस अॅक्ट’ सुरु आहे. सत्ताधाऱ्यांकडून केवळ निवडक लोकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत राऊतांनी राजकीय भेदभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच, अनिलकुमारांना मिळालेली प्रशासकीय बढती ही दादा भुसेंच्या विशेष आग्रहामुळे मिळाली, असा आरोपही राऊतांनी केला.

सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ईडीची चौकशी सुरु आहे. वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभर ईडी कारवाई सुरू असून, त्यांच्या नाशिकसह सटाणा येथील मालमत्तेवर ईडीच्या एका पथकाने सकाळ पासून कारवाई सुरू केले असून त्यांच्या भावाच्या नावावर येथील मालमत्ता आहे. सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिलकुमार पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याचे समजते. सकाळच्या सुमारास सटाणा शहरात इनोव्हा गाड्या व त्यात पोलीस असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu Kashmir Flood : वैष्णो देवीच्या दर्शनला गेले परत आलेच नाहीत, भूस्खलनात ४ उद्योजक भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Wardha Rain : दोन तासाच्या पावसात शेती गेली खरडून; कापूस, सोयाबीनसह संत्रा बागांचे नुकसान

Milk Risks: 'या' लोकांसाठी दूधाचे सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरते, कोणत्या लोकांनी पिणे टाळावे?

Maharashtra Live News Update: एक दिवसीय आंदोलन - नियमांचे पालन करावं; पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई

Manoj Jarange: गोळ्या घाला तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT