A forest team searches the Ghulewadi–Pandhricha Mala area after a leopard attacked a couple, leaving the woman critically injured. Saam Tv
Video

संगमनेरमध्ये बिबट्याची दहशत; पती-पत्नीवर हल्ला|VIDEO

Leopard Terror in Sangamner: संगमनेरमधील घुलेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून ठकुबाई पानसरे गंभीर जखमी आहेत. परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरातील पांढरीचा मळा येथे पती पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ठकुबाई भाऊसाहेब पानसरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात तसेच शहरालगतच्या परिसरातही बिबटे दिसण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषत: ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबटे बाहेर पडत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. परिसरात वनविभागाने गस्त वाढवावी तसेच अत्यावश्यक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes: डायबिटीज झाल्यास काय खावे आणि काय खाऊ नये?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका महापौर पदासाठी उद्या आरक्षण सोडत

भाजपला शह! कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेने 'मॅजिक फिगर' गाठलं, मनसे-काँग्रेसच्या साथीने महापौर बसवणार?

Gold Rate : सोन्याच्या किंमतीत रेकॉर्डब्रेक वाढ, तब्बल ₹७५०० नी महागले, तर चांदीचा 'दस का दम'

Chamcham recipe: घरच्या घरी कशी तयार कराल बंगाली मिठाई चमचम

SCROLL FOR NEXT