Samruddhi Expressway saam tv
Video

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला; मोठं भगदाड पडलं| VIDEO

Bridge Slab Crashes on Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काल इगतपुरी ते आमने या अंतिम टप्प्याचे मोठा गाजावाजा करत उद्घाटन झाले. मात्र आजच संभाजीनगर येथे त्याच पूलाचा स्लप कोसळला आहे.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील माळीवाडा येथुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला. समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अजून दोन वर्षेही पूर्ण झाली नाहीत, त्यात उड्डाण उड्डाणपूल वरचा स्लॅप कोसळल्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम किती निकृष्ट झाले हे आता समोर आले आहे.

धुळे- सोलापूर महामार्गावर असलेला समृद्धी महामार्गावरचा हा पूल आहे. पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळी खालून वाहने जात नव्हती , त्यामुळं भीषण अपघात होता होता वाचला. माळीवाड्या नजीक असलेल्या धुळे सोलापूर महामार्गाच्या वरून गेलेला समृद्धी महामार्गाच्या पुलाचा काही भाग शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसात अचानक कोसळण्याने खालील धुळे सोलापूर महामार्गांवरून जाणाऱ्या दुचाकीस्वार व रिक्षाचालक यांना किरकोळ खर्चाटल.

या घटनेनंतर महामार्ग विभागाने सबधित मेघा कंपनीला कळवून दुरुस्तीचे तात्काळ काम सुरु करण्यात आले आहे. पण समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर अजुन दोन वर्षे पूर्ण झाले नाहीत, पूल पडल्यामुळे या समृद्धीवरील कामाच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण मारणार बाजी? यंदा ठाकरे बंधूंचा करिष्मा चालणार का?

Pimpri-Chinchwad Koita Gang: पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन घरफोड्या करून दागिने लंपास

Maharashtra Live News Update: हत्येच्या आरोपीची नंदूरबार पोलिसांनी काढली शहरातून धिंड

Mumbai–Nanded Weekly Special Trains: सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई–नांदेड दरम्यान ४ विशेष गाड्या सुरू

पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT