Sambhajiraje Chhatrapati News SaamTv
Video

VIDEO : स्मारकाची पाहणी करण्यावर संभाजीराजे ठाम; बोटीने स्मारकाच्या दिशेने रवाना

Sambhajiraje Chhatrapati : 2016 मध्ये भाजप आणि शिवसेना सरकारने अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. पण अद्याप त्याचं काम झालेलं नाही. त्यासाठी आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Saam Tv

भाजप सरकारने जलपूजन केलेल्या अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यावर संभाजीराजे छत्रपती ठाम असून आपल्या काही कार्यकर्त्यांसह आता ते गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने स्मारकाच्या ठिकाणी निघाले आहेत. यावेळी त्यांनी ''मी फक्त मुंबईतील अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक शोधणार आहे. मी पाच वर्ष खासदार असताना यासाठी पाठपुरावा केला होता. ही माझी राजकीय भूमिका नाही. गडकोट किल्ल्यांची अवस्था वाईट आहे. माझा कुणालाही कोंडीत पकडण्यावा प्रयत्न नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अरबी समुद्रात आठ वर्षांपूर्वी डिसेंबर 2016 मध्ये भाजप आणि शिवसेना सरकारने भव्य कार्यक्रम आयोजित करुन अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. शिवस्मारकाच्या जलपूजनाला काही दिवसांत आठ वर्षे पूर्ण होतील, पण महाराजांच्या स्मारकाचे काम काही सुरू झालं नाही. त्यामुळे स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी चला, शिवस्मारक शोधूया असं म्हणत सरकारविरोधात पहिली मोहीम काढली आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

SCROLL FOR NEXT