Sambhaji Raje News SaamTv
Video

VIDEO : सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावं; संभाजीराजे छत्रपतींना धारेवर धरल

Sambhajiraje Chhatrapati : अरबी समुद्रात सरकारने जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी रविवारी संभाजीराजे छत्रपती कार्यकर्त्यांसह निघाले आहेत.

Saam Tv

अरबी समुद्रात आठ वर्षांपूर्वी सरकारने जलपूजन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती निघाले आहेत. संभाजी राजे कार्यकर्त्यांसह मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात रविवारी दाखल झाले. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. यावेळी पोलिसांकडून स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर संभाजी राजे यांनी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे यांनी सरकारला धारेवर धरत केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार आहे, मग स्मारक का होत नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी सर्व परवानग्या असल्याशिवाय पंतप्रधानांना जलपूजनासाठी बोलावणे चुकीचे आहे. पुढे निवडणुका होत्या म्हणून घाईघाईत जलपूजन केले का? असे संभाजीराजे म्हणाले. कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले गेले. मग कुठे आहे हे स्मारक? त्यामुळे आम्ही स्मारक शोधण्यासाठी मोहीम काढली आहे. सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT