Sambhajinagar Rain News Saam TV
Video

Sambhajinagar Rain News: संभाजीनगरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, शेतकऱ्यांना दिलासा!

Sambhajinagar Rain News: राज्यासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पावसानं तुफान बॅटिंग करायला सुरूवात केलीये. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने तुफान बॅटींग करायला सुरूवात केलीये. जिल्ह्यातील संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद या तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बहु नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात टप्प्याटप्याने पाऊस पडतोय. त्यामुळे काही ठिकाणी हापूस, मका पेरणी करण्यात आलीये. तर काही ठिकाणी आणखी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांकडून केली जातेय. दुपारच्या वेळेसही अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून मान्सूननं राज्यासह विदर्भापर्यंत मजल मारलीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. पण दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी भारतीय हवामा विभागाकडून मुंबई, कोकणासह विदर्भाला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT