Sambhajinagar Hostel Food Issue : धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून... किलेअर्क इथल्या समाज कल्याण वसतिगृहाच्या जेवणात गवारीच्या भाजीत पाल आढळली. यामुळे काही विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाला. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करावे लागले. संतप्त विद्यार्थ्यांनी याविरोधात वसतिगृहासमोर रात्री साडेअकरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं. सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या एक हजार मुलांच्या वसतिगृहात युनिट क्रमांक एकच्या भोजनात काल सायंकाळी पाल आढळली. यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी साडेसातला जेवण करताना गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये पाल आढळली. मुलांनी एकच आरडाओरडा केला काहीजणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने आम्हाला मेस चालकाने घाटीत दाखल केले. त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या समोर आंदोलन सुरू केले. ते ठिय्या आंदोलन रात्री साडेअकरापर्यंत सुरू होते. समाज कल्याण सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी असुविधांचा पाढा वाचला. मेस चालक योगिराज गोरशेटे यांनी चूक मान्य करीत माफी मागितली; तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम राहिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.