Shahrukh Khan SaamTv
Video

Shah Rukh Khan : सैफवर हल्ला करणाऱ्याने शाहरुखच्याही घराची केली होती रेकी? मोठी अपडेट आली समोर | VIDEO

Saif Ali Khan Attack Update : सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याच्याही घराची रेकी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केली गेल्याची माहिती समोर आली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खान याच्यावर त्याच्याच राहात्या घरी एका अज्ञात चोरट्याने घुसून हल्ला केला होता. यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यात त्याला ६ जखमा झाल्या असून त्यातील २ जखमा या गंभीर आहेत. सध्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास लावला जात आहे. आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची १० पथकं रवाना करण्यात आलेली होती. तब्बल ३३ तासानंतर पोलिसांना या चोराला शोधण्यात यश आलं आहे. सध्या त्याला पोलिसांनी तब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं समजत आहे. यादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या या चोराने शाहरुख खान याच्या देखील घराची रेकी केली असल्याचं समजत आहे.

दोन ते तीन दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याने बंगल्याची भिंत देखील चढला होता. मात्र भिंतीवरील जाळ्यांमुळे तो अंत जाण्यास असमर्थ ठरला. त्यानंतरच हा जीवघेणा हल्ला सैफ अली खानवर झाला. त्यामुळे या दोन्ही घटनेतील हा इसम एकच असू शकतो अशी शक्यता पोलिसांना आहे. त्याबद्दल सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT