Tourists seen crossing safety barriers at Sahastrakund Waterfall for selfies, risking their lives. Saam Tv
Video

Nanded News: धबधब्यावर सेल्फीच्या नादात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी|VIDEO

Tourist Stunt At Sahastrakund Waterfall: नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर काही तरुणांनी सुरक्षा कठडे ओलांडून स्टंटबाजी केली. यामध्ये एक तरुण पाण्यात पडला पण सुदैवाने इतरांनी त्याला वाचवलं.

Omkar Sonawane

विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणाहून पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत आहेत. परंतु काही हौशी पर्यटक या ठिकाणी लावलेल्या सुरक्षा कठड्याला ओलांडून धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी जात आहेत. असेच काही हौशी चार तरुण धबधब्याच्यावरच्या बाजूला नादी पात्रात सेल्फी घेण्यासाठी उतरले.

स्टंटबाजी करताना यातील एक तरुण पाण्यात पडला त्याला वाचवण्यात इतर तरुणांना यश आलं. धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठडे लावण्यात आले आहेत. परंतु काही हौसे पर्यटक मात्र लावण्यात आलेले सुरक्षा कठडे ओलांडून अशी जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

SCROLL FOR NEXT