छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील एका चौकात पोलिसांनी थांबल्यानंतरही वाहन थांबवले नाही. आणि धक्का मारून गाडी घेऊन गेली म्हणून एका ड्रायव्हर तरुणाला तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केली. Saam TV ने ही बातमी दाखवल्यानंतर शहर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अमानुष मारहाणीवरुन त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. नितीन व्यवहारे, सुधीर मोरे अशी त्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. केवळ धक्का लागला म्हणून त्या व्यक्तीला पोलीस कर्मचाऱ्यांकडून अर्धा तास अमानुष मारहाण करण्यात आली. दुसरीकडे त्याच पोलिसांनी आता ड्रायव्हर वर एका कर्मचाऱ्याला वाहनाने फरपटत नेल्याचा आरोप केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ड्रायव्हर वर गुन्हा दाखल न करता अमानुष मारहाण का केली? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याप्रकरणी आता त्या वाहतूक पोलिसांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करणार हे पहावे लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.