Rupali Chakankar video controvers 
Video

Rupali Chakankar video : संतापजनक! चाकणकरांचा पराक्रम; भोंदू बाबा खरातची विठ्ठलाशी तुलना, अध्यक्षपद केलं अर्पण

Rupali Chakankar video controversy : रुपाली चाकणकर यांचा भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, विठ्ठलाशी तुलना केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Rupali Chakankar viral video Kharat Vitthal comparison : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. चाकणकर यांनी भोंदू बाबा खरात याची तुलना थेट विठ्ठलासोबत केली आहे. इतकेच नाही तर अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांनी त्याच्या चरणी नतमस्तक केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भोंदूगिरीचे आरोप असलेल्या अशोक खरात नावाच्या व्यक्तीसमोर नतमस्तक होत, चाकणकरांनी चक्क आपल्या अध्यक्ष पदाचा बहुमान त्याच्या चरणी अर्पण केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर असे म्हणताना दिसत आहेत की, "माझा हा प्रदेशाध्यक्ष पदाचा बहुमान एक प्रामाणिक कार्यकर्तीला मिळाला आहे, तो मी तुमच्या चरणी अर्पण करते"

चाकणकरांनी अशोक खरातची तुलना थेट विठ्ठलाशी केली आहे. आषाढीला विठ्ठलाचे दर्शन झाले नसेल, मात्र गुरुपौर्णिमेला तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठलाचे दर्शन होत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. समोर आलेल्या दृश्यांमध्ये चाकणकर या भोंदू बाबाच्या चरणाची पूजा करताना आणि पाय धुताना स्पष्टपणे दिसत आहेत. ही घटना जुलै २०२१ मध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आयोजित एका पूजेदरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 13 कोटी मतदार वगळल्याच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT