Mahadev jankar News SaamTv
Video

Mahadev Jankar : ईव्हीएमबाबत जानकरांचा खळबळजनक दावा, म्हणाले.. | VIDEO

EVM Hacking Allegations : राज्यात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच आता रासपच्या महादेव जानकर यांनी देखील मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Saam Tv

ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वत: इंजिनियर आहे. त्यामुळे मला सगळं माहिती आहे, असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, म्हणून महायुतीच्या जागा निवडून आल्या, असा खळबळजनक आरोपसुद्धा जानकर यांनी केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्याविरोधात आंदोलन देखील सुरू करण्यात आलं आहे. अशातच आता रासपचे महादेव जानकर यांनी देखील याबाबत खळबळजनक दावा केला आहे. मी स्वत: इंजिनियर असल्याने ईव्हीएम हॅक करता येतं हे मला माहिती आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे. तसंच मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यातून बाहेर आलो आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही, त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. त्यामुळं येत्या काळात आमची एकला चलोची भूमिका असेल अस म्हणत असतानाच माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे, कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू असा इशारा रासापाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिलाय.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT