MLA Rohit Pawar scolds officials during Jamkhed meeting after citizens’ complaints Saam TV Marathi News
Video

Rohit Pawar : आतापर्यंत गोट्या खेळत होतात का? रोहित पवार अधिकाऱ्यांवर संतापले | VIDEO

Rohit Pawar angry video Jamkhed meeting full speech : जामखेड नगरपरिषद आमसभेत नागरिकांच्या तक्रारींवरून आमदार रोहित पवार संतापले. "आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?" अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. कचरा व्यवस्थापन, चिखलमय रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Namdeo Kumbhar

Rohit Pawar lashes out at negligent officers in Maharashtra : अनेकदा राज्य आणि देश पातळीवरील विविध विषयांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात (कर्जत-जामखेड) अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. जामखेडमध्ये आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या. यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. "आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?" अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले.

नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या. नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट... कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin e-KYC : ओटीपी येईना, वेबसाईटवर एरर, ई-केवायसी करताना लाडकीला अडचणीवर अडचणी

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठं खिंडार! नेते, पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते ठाकरेसेनेत करणार प्रवेश

Jacqueline Fernandez: भिवंडीच्या चिमुकल्यासाठी जॅकलिन बनली देवदूत; लाखमोलाची केली मदत, वाचा सविस्तर

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेपाळसारखं नेत्यांना तुडवावं लागेल, तुपकार यांचं वादग्रस्त विधान

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; खेडकर कुटुंबाचा चालकाला अटक, कुटुंबीय अद्याप फरार

SCROLL FOR NEXT