Rohit Pawar claims Ajit Pawar’s close MLA Sangram Jagtap may soon join BJP, sparking fresh political debate in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात खळबळ! अजित पवारांचा 'हा' आमदार भाजपच्या वाटेवर? त्या नेत्याच्या वक्तव्याने प्रवेशाची चर्चा रंगली|VIDEO

Rohit Pawar Statement On Ajit Pawar Group: अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Omkar Sonawane

अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे सातत्याने दोन गटात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करताना दिसत आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दिवाळीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला पाहिजे. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले मशिदीतून घडत आहे. असे वक्तव्य संग्राम जगताप यांनी केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

यावरच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले, तिथलं वातावरण भाजप खराब करत आहे. 2029 ला संग्राम जगताप अजितदादांच्या पक्षातून न लढता भाजपमधून लढणार आहे. संग्राम जगतापांच्या बाबतीत जाळी पसरवण्यात आली होती त्यात ते अडकलेले आहेत. बीजेपीचे नेते नक्कीच संग्राम जगताप यांना पाठबळ देतेय. त्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असून आगामी काळामध्ये भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल. 2029 मध्ये भाजप स्वबळावर लढेल त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी खूप वेळ गेलेली असेल. असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल 10 मिनिटे विलंबाने सुरु

Calcium Deficiency: कॅल्शियमची कमतरता असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणं

Chinch Gulachi Amti Recipe: आंबट- गोड चिंच, गुळाची आमटी कशी बनवण्याची? सोपी रेसिपी जाणून घ्या

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT