Pranjal khewalkar Rohini Khadese saam tv
Video

Rohini Khadse : रोहिणी खडसेही अडचणीत? खेवलकरच्या मोबाइलचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा डिलिट, पोलिसांना वेगळाच संशय

Rohini Khadse in Trouble : रेव्ह पार्टी प्रकरणात पाय खोलात असलेल्या प्रांजल खेवलकरसह पत्नी रोहिणी खडसे या देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Akshay Badve

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला प्रांजल खेवलकरसह पत्नी रोहिणी खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. मोबाइलमधील पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा पोलिसांना संशय असून, संशयाची सुई ही रोहिणी खडसेंच्या दिशेने असल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी याबाबत कोर्टात नवी माहिती दिली आहे.

प्रांजल खेवलकरकडून पुणे पोलिसांनी दोन मोबाइल जप्त केले होते. त्यातील एक नंबर हा सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावाने घेण्यात आला होता. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सीम हरवले असल्याचे सांगून पुन्हा तोच क्रमांक मिळवला. त्या क्रमांकावर व्हॉट्सअॅप डाउनलोड करून सर्व डेटा डिलिट केला. त्यामुळे पोलिसांकडे असलेल्या खेवलकरच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप डेटा डिलिट झाला. हे सर्व रोहिणी खडसेंनी घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सोनार नावाच्या व्यक्तीसह रोहिणी खडसेंना देखील सहआरोपी करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे सांगितले जात आहे.

खेवलकरच्या जामीन अर्जावर ४ सप्टेंबरला सुनावणी

प्रांजल खेवलकरच्या जामीन अर्जावर ४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. पुणे कोर्टात आज, सोमवारी सुनावणी झाली. खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, येरवडा कारागृहात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : रांजणगाव गणेश चतुर्थीला भक्तांची अलोट गर्दी

Abhijeet Khandkekar: अभिजीत खांडकेकरच्या नाशिकच्या घरी बाप्पा विराजमान|VIDEO

Romario Shepherd : नाद करायचा नाय आमचा! पठ्ठ्याने एका चेंडूत कुटल्या २० धावा, एका पाठोमाग ३ षटकार, VIDEO

'या' 5 सवयी असलेल्या मुलांपासून दूर पळतात मुली

Maharashtra Live News Update: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संपर्क कार्यालयात श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना

SCROLL FOR NEXT