Ravindra Chavan latest news saam tv
Video

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मोठी कारवाई! बड्या नेत्याचा घेतला तडकाफडकी राजीनामा; राज्याच्या राजकारणात खळबळ

Ravindra Chavan Action Against Sunil Kedar: नाशिक भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता नावे निश्चित केल्याच्या प्रकरणाची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दखल घेत सुनील केदार यांचा राजीनामा घेतला.

Omkar Sonawane, Ganesh Kavade

नाशिक महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपचे नाशिक महानगरअध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता परस्पर नगरसेवकांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील केदार यांच्यावर कारवाई करत त्यांचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

स्वीकृत नगरसेवकांची यादी

पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीला दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट-काँग्रेस आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजपकडून रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांची नावे प्रस्तावित आहेत. शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीकडून चंद्रकांत लवटे आणि विनायक आढाव, तर ठाकरे गट-काँग्रेस आघाडीकडून हेमंत गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NASA Research : चंद्रावरही होणार बटाट्याची शेती, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना मोठं यश, हा प्रयोग नेमका आहे तरी काय?

Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभू वयाच्या ३९ व्या वर्षी झाली आई; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Maharashtra News Live Update: काँग्रेस लागली लोकभेच्या तयारीला

सतत तक्रार करणाऱ्यांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? मानसशास्त्र काय सांगतं?

टीम इंडियातून सिराज 'आऊट'! क्रिकेटच्या मैदानात राजकारणाची एण्ट्री; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

SCROLL FOR NEXT