Shiv Sena (Shinde faction) workers celebrate as exit polls predict a big win in Ratnagiri Zilla Parishad elections. 
Video

Ratnagiri ZP Election Exit Poll: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ठाकरेंच्या बाल्लेकिल्ल्यावर शिंदेसेनेचा झेंडा फडकणार? भाजपचीही पिछाडी

Maharashtra ZP Elections Exit Poll: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर साम टीव्ही एक्झिट पोल समोर आलेत. यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एक्झिट पोलमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे सेना आघाडीवर आहे.

Bharat Jadhav

  • रत्नागिरी हा उद्धव ठाकरे यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता.

  • एक्झिट पोलनुसार शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

  • ठाकरे सेनेला फक्त १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

नगर पंचायतीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदे सेना वरचढ ठरताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा परिणाम एक्झिट पोलमधून दिसत आहे. मुळात रत्नागिरी हा उद्धव ठाकरेंचा बाल्लेकिल्ला असल्याचं म्हटलं जातं परंतु आता हा किल्ला ढासळताना दिसत आहे. ठाकरे सेनेला येथे फक्त १० जागा मिळताना दिसत आहेत, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ३० जागा मिळणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर या निवडणुकांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. साम टीव्हीनं केलेल्या एक्झिट पोलनुसार रत्नागिरीत शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरलाय. बहुतेक ठिकाणी बहुमत मिळवणाऱ्या भाजपला रत्नागिरीमधील मतदारांनी कात्रजचा घाट दाखवलाय. रत्नागिरीमधील जिल्हा परिषदेत भाजप फक्त ६ जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेनेनंतर ठाकरे सेनेनेही येथे दमदार कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT